Nagpur | 50 वर्षात कापसाला उच्चांकी दर, शेतकऱ्यांमध्ये समाधान
50 वर्षांत पहिल्यांदाच कापसाला 10 हजार रुपये क्विंटलपेक्षा जास्त दर मिळालाय. गेल्यावर्षीच्या तुलनेत 40 ते45 टक्के जास्त दर मिळाल्याने कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय.
नागपूर : 50 वर्षांत पहिल्यांदाच कापसाला 10 हजार रुपये क्विंटलपेक्षा जास्त दर मिळालाय. गेल्यावर्षीच्या तुलनेत 40 ते45 टक्के जास्त दर मिळाल्याने कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय. पण यंदा उत्पादन घटल्याने दरवाढीचा जास्त फायदा शेतकऱ्यांना झाला नाही, पण तरिही विदर्भातील कापूस उत्पादक समाधानी आहे. विदर्भातील शेतकऱ्यांचं हक्काचं पीक असलेल्या कपाशीच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार आहे.