Covaxin | कोव्हॅक्सिनची ट्रायल पूर्ण, लस 77 टक्के प्रभावी असल्याचा कंपनीचा दावा
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा डाटा समोर आला आहे. वृतसंस्था एएनआयनं सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 77.8 टक्के प्रभावी राहिल्या आहेत.
भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचा तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलचा डाटा समोर आला आहे. वृतसंस्था एएनआयनं सूत्रांच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 77.8 टक्के प्रभावी राहिल्या आहेत. मात्र, याविषयी सविस्तर माहिती समरो आलेली नाही. भारत बायोटेकनं भारत सरकारला कोवॅक्सिन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची माहिती सोपवण्यात आली होती. केंद्र सरकारनं ती माहिती डीसीजीआयकडे सोपवली असून त्या माहितीची समीक्षण सुरु असल्याची माहिती आहे. कोवॅक्सिन ही भारतीय बनावटीची पहिली लस आहे. जागतिक आरोग्य संघटना देखील कोवॅक्सिन लसीला मंजुरी देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.