VIDEO : Sangli | सांगलीत मुख्यमंत्र्यांसमोरचं आंदोलन पडलं भारी, 20 जणांवर गुन्हा दाखल
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान सांगलीतील भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या गोंधळाप्रकरणी तब्बल 20 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या 10 कार्यकर्त्यांसह 20 जणांवर संगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सांगलीच्या हरभट रोडवरील बाजारपेठेत सोमवारी उद्धव ठाकरे व्यापाऱ्यांच्या व्यथा जाणून घेत असतानाच मोठा गोंधळ झाला होता. भाजप कार्यकर्त्यांनी अचानक सरकार विरोधात घोषणाबाजी देत रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तिथे जमलेल्या शिवसैनिकांनीही जोरदार घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्या दरम्यान सांगलीतील भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांच्या गोंधळाप्रकरणी तब्बल 20 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजपच्या 10 कार्यकर्त्यांसह 20 जणांवर संगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.