राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते, अमोल मिटकरींची राज ठाकरेंवर टीका

| Updated on: Apr 13, 2022 | 12:31 PM

राज ठाकरे यांना भोंग्यांची आताच आठवण झाली का? एवढे दिवस कुठे झोपले होते? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. अजितदादांच्या या प्रश्नाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. यावर अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.,

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांना भोंग्यांची आताच आठवण झाली का? एवढे दिवस कुठे झोपले होते? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केलं होतं. अजितदादांच्या या प्रश्नाचा मनसे (mns) अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाचार घेतला आहे. भोंग्यांबाबतची माझी भूमिका आजची नाहीये. जुनीच आहे. या मुद्द्यावर मी वारंवार बोललो आहे. माझी मेमरी शार्प आहे. मी कधी काय बोललो हे मला अजूनही आठवतं. त्यामुळे अजितदादा मी तुमच्यासाठी तीन व्हिडिओ आणले आहेत. ते जरा एकदा पाहूनच घ्या, असं सांगत राज ठाकरे यांनी भरसभेत त्यांच्या भाषणाचे तीन व्हिडीओ दाखवले. यावर अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

Dananjay Munde यांची सध्या प्रकृती उत्तम, त्यांना विश्रांतीची गरज, संजय बनसोडे यांची माहिती
धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला; अजित पवारांची माहिती