महाराष्ट्रातील मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा, कुणी काय केला हल्लाबोल?
मोदींनी काल तीन मतदारसंघात जोरदार सभा घेतल्या तर आजही महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. दरम्यान सुरू असलेल्या मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांनी निशाणा साधलाय. होत असलेल्या सभांवरून विरोधकांनी भाजपला चांगंलंच लक्ष्य केलंय. कुणी काय केली टीका?
पश्चिम महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा धडाका सुरू आहे. मोदींनी काल तीन मतदारसंघात जोरदार सभा घेतल्या तर आजही महायुतीच्या उमेदवारांसाठी नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. दरम्यान सुरू असलेल्या मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांनी निशाणा साधलाय. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सोलापुरात राम सातपुते, कराडमध्ये उदयनराजे भोसले आणि पुण्यात मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार आणि आढळराव पाटील या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. तर आज मंगळवारी माळशिरसमध्ये रणजितसिंह निंबाळकर, लातूरमध्ये सुधाकर श्रृंगारे आणि धाराशिवमध्ये अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहेत. याच होत असलेल्या सभांवरून विरोधकांनी भाजपला चांगंलंच लक्ष्य केलंय. महाराष्ट्रात मोदींच्या जेवढ्या जास्त सभा होतील तेवढा आम्हाला जास्त फायदा होणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. तर यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केलाय. बघा काय म्हणाले….