Sangli | सांगलीत मगरीचं दर्शन, मगरीला पकडण्यात प्राणीमित्रांना यश
वनविभाग प्राणीमित्र आणि तरुण यांनी अथक प्रयत्न करीत मगरीला पकडले आणि मगरीला वन विभागाच्या स्वाधीन केले.
सांगली : सांगलीवाडीमधील मुस्लिम दफन भूमी परिसरात भल्यामोठ्या मगरीचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले होते. वनविभाग प्राणीमित्र आणि तरुण यांनी अथक प्रयत्न करीत मगरीला पकडले आणि मगरीला वन विभागाच्या स्वाधीन केले. यावेळी या मगरीला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.