महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर भीमसागर उसळला
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासून नागरिकांनी गर्दी केली आहे.
मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठया संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासून नागरिकांनी गर्दी केली आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करताना दिसत आहेत. सामान्य नागरिकांप्रमाणेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अनेक नेत्यांनी देखील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले.