Solapur | पुत्रदा एकादशीनिमित्त विठ्ठल दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सकाळपासूनच चंद्रभागा स्नान आणि संत नामदेव पायरीपासून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे एका बाजूला पंढरपूरमध्ये कडकडीत बंद तर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी असल्याचे चित्र पहायला मिळाले.
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 13 ऑगस्टपासून पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान आज पंढरपुरात संचार बंदी असतानाही भाविकांची श्री विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे.आज जवळपास पन्नास हजार भाविक पंढरपूर मध्ये दाखल झाले आहेत. आज श्रावणी पुत्रदा एकादशी आहे. एकादशीच्या निमित्ताने अनेक भाविक आज पंढरपुरात आले आहेत. सकाळपासूनच चंद्रभागा स्नान आणि संत नामदेव पायरीपासून विठ्ठल दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. त्यामुळे एका बाजूला पंढरपूरमध्ये कडकडीत बंद तर मंदिर परिसरामध्ये भाविकांची मांदियाळी असल्याचे चित्र पहायला मिळाले.