Ashadhi Ekadashi 2024 : स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्यासाठी तीरावर वारकऱ्यांची तुफान गर्दी

| Updated on: Jul 17, 2024 | 1:09 PM

आषाढी एकादशीच्या आधीपासूनच चंद्रभागेचा काठ वारकऱ्यांनी भरून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आजही पहाटेपासून वारकऱ्यांनी स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्याचं पुण्य कर्म केलं जात आहे. असं असलं तरी या वारकऱ्यांना वारंवार प्रशासनाकडून आवाहनही केलं जात आहे की....

आजच्या दिवसाची लाखो वारकरी आतुरतेने वाट पाहत होते आणि आज तो दिवस आलाय. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येपासूनच चंद्रभागा नदीचा काठ वारकऱ्यांनी फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. कालच विठू माऊलीचा जयघोष करीत लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपूर नगरीमध्ये दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती या अभंगाची प्रचिती आज पंढरपुरात पाहायला मिळत आहे. आषाढी एकादशीच्या आधीपासूनच चंद्रभागेचा काठ वारकऱ्यांनी भरून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. आजही पहाटेपासून वारकऱ्यांनी स्वच्छ, नितळ चंद्रभागेत स्नान करण्याचं पुण्य कर्म केलं जात आहे. असं असलं तरी या वारकऱ्यांना वारंवार प्रशासनाकडून आवाहनही केलं जात आहे की, चंद्रभागा स्वच्छ आणि नितळ ठेवण्याचं कामही आपलंच आहे. त्यामुळे चंद्रभागेच्या तिराचं मनमोहक रूप आज पाहायला मिळालं. बघा त्याचाच एक व्हिडीओ…

Published on: Jul 17, 2024 01:09 PM
Ashadhi Ekadashi 2024 : अनुपम्य सुख सोहळा… मुख्यमंत्र्यांसह ‘या’ वारकरी दाम्प्त्याला मिळाला विठुरायाच्या महापूजेचा मान
Maharashtra Weather Update : कोकणात पुढील 4 दिवस धुव्वाधार… मुंबई पुण्यात कसा पाऊस? काय सांगतंय हवामान खातं?