VIDEO : Kalyan | दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर खरेदी, दादरसह कल्याणमध्येही नागरिकांची झुंबड
उद्याच्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी कल्याणच्या फूल बाजारात तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी प्रचंड होती की बैलबाजार आणि नेतिवलीपर्यंतची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना सकाळी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडावी लागली.
उद्याच्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर आज झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यासाठी कल्याणच्या फूल बाजारात तुफान गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी प्रचंड होती की बैलबाजार आणि नेतिवलीपर्यंतची वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे वाहतूक पोलिसांना सकाळी सकाळी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक कोंडी सोडावी लागली. दसऱ्या निमित्ताने आज पहाटेच कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. फळं, झेंडूची फुले आणि तोरण खरेदी करण्यारसाठी ही गर्दी झाली होती. यावेळी एपीएमसी मार्केटमध्ये प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे अचानक नागरिकांची गर्दी उसळल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.