वृंदावनमध्ये होळीचा उत्साह शिगेला
मथुरेच्या वृंदावनमध्ये आज होळीचा उत्सव मोठा उत्साहात साजरा होत आहे. होळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. चौफेर रंगाची उधळण होत असल्याचे पहायला मिळत आहे. वृंदावनची होळी ही देशभरातील नागरिकांच्या आकर्षणाचा विषय असते.
मथुरेच्या वृंदावनमध्ये आज होळीचा उत्सव मोठा उत्साहात साजरा होत आहे. होळीचा उत्साह शिगेला पोहोचलाय. चौफेर रंगाची उधळण होत असल्याचे पहायला मिळत आहे. वृंदावनची होळी ही देशभरातील नागरिकांच्या आकर्षणाचा विषय असते. नागरिकांनी आज होळीसाठी वृंदावनमध्ये गर्दी केली आहे. गेले दोन वर्ष देशावर कोरोनाचे सावट होते. कोरोनामुळे होळीसोबतच जवळपास सर्वच सणांवर निर्बंध आले होते. मात्र आता कोरोनाचे संकट कमी झाल्याने पुन्हा एकदा नागरिकांमध्ये होळीचा उत्साह पहायला मिळत आहे. आज होळी मोठ्या धुमधडाक्यात साजरी होत आहे.