VIDEO : Nashik Corona | नाशकात बाजारपेठांमध्ये विनामास्क गर्दी, नागरिकांचा हलगर्जीपणा
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत बुधवारी प्राप्त अहवालानुसार सध्या जिल्ह्यात 1 हजार 43 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या आरोग्य सचिवांनी नाशिकमध्ये येत्या पाच दिवसांत अफाट संख्येने रुग्ण वाढतील, अशी शक्यता वर्तवलीय. मात्र, तरीही नाशकात बाजारपेठांमध्ये विनामास्क गर्दी, नागरिकांचा हलगर्जीपणा दिसतो आहे.
नाशिक जिल्ह्यात अक्षरशः कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत असून दुसऱ्या लाटेनंतर पहिल्यांदाच रुग्णांच्या आकडेवारीने हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत बुधवारी प्राप्त अहवालानुसार सध्या जिल्ह्यात 1 हजार 43 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे राज्याच्या आरोग्य सचिवांनी नाशिकमध्ये येत्या पाच दिवसांत अफाट संख्येने रुग्ण वाढतील, अशी शक्यता वर्तवलीय. मात्र, तरीही नाशकात बाजारपेठांमध्ये विनामास्क गर्दी, नागरिकांचा हलगर्जीपणा दिसतो आहे. ओमिक्रॉनची भीती आणि कोरोनाचा अतिजलद होणारा संसर्ग पाहता राज्याच्या आरोग्य सचिवांनी महापालिकेला एक पत्र पाठविले आहे. त्यात आगामी पाच दिवस नाशिकरांसाठी अतिधोक्याचे ठरू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. या काळाता कोरोना रुग्णांची संख्या अचानक कितीतरी पटीने वाढू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे.