Aryan Khan Case : आर्यन खानचा जामीन अर्ज किल्ला कोर्टानं पुन्हा फेटाळला!
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे.
क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात मुंबई कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर आर्यन खानसह मूनमून धमेचा तसेच अरबाज मर्चंट यांना तुरुंगातच मुक्काम करावा लागणार आहे. तर दुसरीकडे मुंबई न्यायालयाच्या निकालाविरोधात आम्ही सत्र न्यायालकडे दाद मागू असे आर्यन खानच्या वकिलांनी सांगितले आहे.
मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. मात्र, अखेर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आर्यन खानला तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे.