हा पिक्चरचा सीन नाही, पण पिक्चरच्या सीनपेक्षा कमीही नाही! कांदिवलीत प्लॅटफॉर्मवर चोर-पोलिसाचा थरार

| Updated on: Feb 04, 2022 | 10:45 PM

CCTV Video of Kandivali Police & Theft : सीसीटीव्हीमध्ये आरोपी एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून रेल्वे ट्रॅक ओलांडताना मागे मागे पळताना दिसतोय. त्याच्या मागे मुंबई पोलीस कर्मचारीही पाठलाग करताना दिसलेत.

मुंबई : मुंबई रेल्वे स्थानकात लोकलखाली येताना अनेकांना वाचवणारे सीसीटीव्ही व्हिडीओ तुम्ही पाहिले असतीलच. पण आता रेल्वे स्थानकातला चोर-पोलिस हा फिल्मीस्टाईल थरारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video of Kandivali Police & Theft) कैद झाला आहे. मुंबईच्या कांदिवली रेल्वे (Kandivali Railway Station ) स्थानकातली ही घटना असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Policeप्लॅटफॉर्मवर आरोपीचा पाठलाग केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलं आहे. एका प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणारा एक चोर प्लॅटफॉर्मवरुन पळाला. यानंतर कांदिलवील पोलिस ठाण्यातील दोन शिपायांनी प्लॅटफॉर्मवरच चोराला पकडण्यासाठी धाव घेतली. आरोपीला फिल्मी स्टाईल पकडून अखेर रेल्वे पोलिसांच्या ताब्यातही दिलंय. कांदिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर हा सगळा थरार लोकल प्रवाशांनीही अनुभवला. या थरारक घटनेत मुंबई पोलिसांनी केलेल्या कामगिरीचं सगळ्यांनीच कौतुक केलं असून मोबाईल चोराट्याच्या मुसक्याही आवळल्यात.

बंडातात्या कराडकार यांच्या याच वक्तव्याने मोठा वाद, ऐका नेमकं काय म्हणाले बंडातात्या…
शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी आमदार राजू पाटील आक्रमक