Nagpur | नागपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू, सोशल मीडियावर भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाकण्यास बंदी
नागपूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदार पोलिसांची आहे. खबरदारीची भूमिका घेत पोलिस आयुक्तांनी शहरात जमावबंदी कायदा लागू केलीय. त्यानुसार आजपासून शहरात पाच जणांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कलम 144 (1) नुसार कारवाई केली जाणार आहे.
शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदार पोलिसांची आहे. खबरदारीची भूमिका घेत पोलिस आयुक्तांनी शहरात जमावबंदी कायदा लागू केलीय. त्यानुसार आजपासून शहरात पाच जणांपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कलम 144 (1) नुसार कारवाई केली जाणार आहे. नागपुरात नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेय. शहरात जवळपास 31 संवेदनशील परिसरात साध्या वेशात पोलिस तैनात करण्यात आलेत. मोर्चे आणि आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली. पोलिसांकडून धर्मगुरु यांच्याशी चर्चा सुरू आहे. धार्मिक भावना भडकवणारी अफवा पसरवली जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिलीय.
Published on: Nov 15, 2021 03:30 PM