युक्रेनमधील खारकीवमध्ये कर्फ्यू
युक्रेनमधील खारकीव येथे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. रशियाकडून सतत होत असणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधी खारकीव शहरात कर्फ्य लावण्यात आला आहे. कालच भारतीय दूतावासाकडून भारतीय लवकरात लवकर खारकीव शहर सोडण्याचे आदेश दिले होते.
युक्रेनमधील खारकीव येथे सायंकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला आहे. रशियाकडून सतत होत असणाऱ्या हल्ल्यामुळे युक्रेनमधी खारकीव शहरात कर्फ्य लावण्यात आला आहे. कालच भारतीय दूतावासाकडून भारतीय लवकरात लवकर खारकीव शहर सोडण्याचे आदेश दिले होते. येथील परिस्थिती गंभीर बनत चालल्याने येथील लष्कराकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. खारकीव शहरातील अनेक इमारती क्षेपणास्त्रांनी उडवून देण्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचाही मृत्यू झाला असून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. रशियाकडून होत असलेल्या हल्ल्यामुळे युक्रेनमधील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रशियाकडून युक्रेनमधील अनेक पाण्याची केंद्रे नष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी माणसं तडफडत आहेत.