‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचं थैमान, गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ आणि व्दारकाला फटका

| Updated on: Jun 16, 2023 | 6:30 AM

'बिपरजॉय' वादळाचा गुजरातमध्ये हाहाकार, किनारपट्टी भागात जोरदार पावसासह लँडफॉल आणि गुजरातमधील कच्छ, भुज, द्वारका, जामनगर, बडोदा यासह अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस

गुजरात : गुजरातच्या किनारपट्टीवर बिपरजॉय चक्रीवादळाचा जोर कायम असून मोठ्या प्रमाणात अनेक शहरांना फटका बसला आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ आणि व्दारकाला मोठा फटका बसला आहे. तर गुजरात किनारपट्टी भागात जोरदार पावसासह लँडफॉल झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुजरात सरकारकडून वादळानंतर झालेल्या नुकसानीवर उपाय योजना करण्यात येत असून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतलाय. दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार वादळाचा तडाका हा मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हे वादळ ताशी 15 किलोमीटर वेगाने पुढे सरकत आहे. वादळाचा वेग अधिक असल्याने या वादळामुळे रात्रभर पावसाच्या शक्यता आहे. वादळाला आता कच्छच्या जाखाऊ बंदरात हे वादळ पोहोचण्याची शक्यता वर्तवली आहे. तर पुढील 5 ते 6 तास सौराष्ट्र आणि कच्छसाठी आव्हानात्मक असणार आहेत असंही हवामान विभागाचे मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले. तर गुजरातमधील कच्छ, भुज, द्वारका, जामनगर, बडोदा यासह अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे.

Published on: Jun 16, 2023 06:28 AM
“आमची मैत्री म्हणजे फेव्हिकॉलचा जोड”, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका
गेल्या १५ दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिलांचा BMC अधिकाऱ्यांना घेराव