Cyclone Gulab | आज गुलाब चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार
Cyclone Gulab | वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांमध्ये 7 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या काही भागात ‘गुलाब’ (Cyclone Gulab)चक्रीवादळाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्राचं शनिवारी ‘गुलाब’ चक्रीवादळामध्ये रुपांतरीत झालं आहे. आयएमडीच्या वादळ चेतावणी विभागानं चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची आणि रविवारी संध्याकाळी उत्तर आंध्र प्रदेशातील कलिंगपट्टणम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही याचा पिरणाम जाणवू शकतो.
आयएमडीने म्हटले आहे की, वायव्य आणि लगतच्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र गेल्या सहा तासांमध्ये 7 किमी प्रतितास वेगाने पश्चिमेकडे सरकले आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळात तीव्र झाले असून उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशासाठी वादळाचा इशारा जारी करण्यात आला आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अत्यंत खराब हवामानाचा इशारा ऑरेंज अलर्टच्या स्वरूपात दिला जातो आणि या दरम्यान रस्ते आणि रेल्वे वाहतूक बंद होण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता असते.