Cyclone Remal Impact : रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, ‘या’ राज्याला बसला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळामुळे आतपर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मिझोराम या राज्याला बसला आहे. मिझोराममध्येच २९ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, मदत पथकांनी आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढले
पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रेमल नावाचं चक्रीवादळ धडकल्याने तेथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये एकच धांदल उडाली आहे. रेमल चक्रीवादळामुळे आतपर्यंत ३६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. रेमल चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मिझोराम या राज्याला बसला आहे. मिझोराममध्येच २९ जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, मदत पथकांनी आतापर्यंत २७ जणांचे मृतदेह बाहेर काढले असून रेमलचा फटका बसलेल्या ठिकाणी शोध आणि बचाव कार्य सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रेमल चक्रीवादळाचा तडाखा बसण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले झाले आहे. यासह वीज आणि इंटरनेट सेवाही ठप्प झाली आहे. पश्चिम बंगाल किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडल्याने बरीच घरे उद्ध्वस्त झाली आहेत. यासह वीजवाहिन्या तुटल्याने शेकडो लोकांना मदत छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. रेमल चक्रीवादळाने सर्वाधिक नुकसान झालेले मिझोराम हे राज्य आहे.