Special Report | डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण होणार या थापा, पूनावालांचे केंद्राला ‘डोस’

| Updated on: Aug 13, 2021 | 11:48 PM

सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्यात जास्त कोरोना आहे, इथं लस द्या असं केंद्र सरकारला सांगितलं, पत्रही लिहिलं, पण मोदी सरकार त्याचं उत्तरच देत नाही, अशी प्रतिक्रिया सायरस पुनावाला यांनी दिली आहे.

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. अशावेळी कोरोना लसीचा तुटवडा भासत असल्यामुळे लसीकरण मोहीम अधिक प्रभावी होताना दिसत नाही. अशावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुण्यात जास्त कोरोना आहे, इथं लस द्या असं केंद्र सरकारला सांगितलं, पत्रही लिहिलं, पण मोदी सरकार त्याचं उत्तरच देत नाही, अशी प्रतिक्रिया सायरस पुनावाला यांनी दिली आहे. सायरस पुनावाला यांच्या या वक्तव्यामुळे लसीकरणावरुन राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असं जोरदार राजकारण रंगण्याची चर्चा आहे. (Cyrus Poonawala criticizes Narendra Modi govt over Pune vaccine supply and not answering his letter)

पुण्यात सर्वाधिक कोरोना प्रादुर्भाव आहे. त्यामुळे पुण्यात जास्त लस द्या, असं केंद्र सरकारला सांगितलं, एक पत्रही लिहिलं पण मोदी सरकार त्याचं उत्तरंच देत नाही, असं सायरस पुनावाला यांनी म्हटलंय. लॉकडाऊन लावला नाही तर हर्ड इम्युनिटी तयार होते. 6 महिन्यानं लसीचा प्रभाव कमी होतो म्हणून बुस्टर डोसची गरज आहे. कदाचित त्यानंतरही लसीचा डोस घ्यावा लागू शकतो, असं पुनावाला म्हणाले. आम्ही वर्षाला 110 कोटी लस बनवू शकतो, त्यापेक्षा जास्त लस बनवू शकत नाही. इतर कंपन्या किती लस बनवतात हे माहिती नाही. त्यावरुन तुम्ही गणित करा आणि बघा की राजकारणी किती थापा मारत आहेत, असा गंभीर मुद्दाही पुनावाला यांनी उपस्थित केलाय.

मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून 84 दिवसांचं अंतर

नोवोवॅक्स ही लस 12 वर्षापर्यंतच्या मुलांना देता येईल. पण अमेरिकेत काही परवानग्या बाकी आहे. त्यामुळे लगेच लहान मुलांना लस मिळणार नाही, असंही पुनावाला म्हणाले. त्याचबरोबर तिसरी लाट जास्त गंभीर नसेल असा दावाही त्यांनी केलाय. मोदी सरकानं एक्स्पोर्ट बंद केली हे खूप वाईट झालं. मात्र, यावर बोलू नका असं मला मुलानं सांगितलं असल्याचं सायरस पुनावाला म्हणाले. अमेरिकेत आताही अनेकांना लागण होत आहे. कोरोना जाणार नाही. दोन लसींमध्ये दोन महिन्यांचं अंतर योग्य आहे. पण मोदी सरकारला लस मिळाली नाही म्हणून त्यांनी दोन डोसमध्ये 84 दिवसांचं अंतर ठेवण्यास सांगितलं आहे. आम्हाला नफ्यात खूप नुकसान सहन करावं लागलं. सर्वांची अपेक्षा आहे की आम्हाला लस मिळावी पण ते शक्य नाही. मी लस विकून पैसे कमवायला बसलेलो नाही पण लोकांनी लस घ्यावी, असं आवाहनही सायरस पुनावाला यांनी केलंय.

निष्काळजीपणामुळेच जास्त मृत्यू झाल्याचा आरोप

निष्काळजीपणामुळे लोकांचे मृत्यू झाले आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे, असा गंभीर आरोपही सायरस पुनावाला यांनी केलाय. तसंच दोन लसी एकत्र करण्यास आपला विरोध आहे. 6 महिन्यानंतर लसीचा प्रभाव कमी होत आहे. तिसरा डोस किंवा बुस्टर डोस घेतला पाहिजे. तिसरी लाट जास्त गंभीर नसेल, असंही सायरस पुनावाला यांनी म्हटलंय.

इतर बातम्या 

विनावर्दी कारवाई नको, साध्या वेशात तर नाहीच नाही, मुंबई पोलीस आयुक्तांचे आदेश

हवाई प्रवास आजपासून महागला, सरकारने देशांतर्गत उड्डाणांचे भाडे 13 टक्क्यांनी वाढवले ​

(Cyrus Poonawala criticizes Narendra Modi govt over Pune vaccine supply and not answering his letter)

Published on: Aug 13, 2021 11:48 PM
Special Report | पवारांनी जातीचं विष पेरलं, राज ठाकरेंच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 14 August 2021