‘या चांडाळ चौकटीनेच शिवसेनेचा घात केला’, दादा भुसे यांनी नाव न घेता केला थेट हल्लाबोल

| Updated on: Feb 19, 2023 | 5:06 PM

VIDEO | कालपर्यंत सोबत होतो म्हणून आम्ही चांगले, आज वाईट झालो...मला संजय राऊत यांची कीव येते; काय म्हणाले दादा भुसे बघा व्हिडीओ

नाशिक : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला असून शिवसेना नाव आणि पक्षाचं चिन्ह घेण्यासाठी 2000 कोटी रूपयांचा व्यवहार झाल्याचे ते म्हटले आहे. यावर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल केला. कालपर्यंत आम्ही सोबत होतो तर चांगले होते. मात्र आज अचानक वाईट झालो. हे वाईट आहे मला अशा लोकांची कीव येते. कालपर्यंत सोबत असणाऱ्याबद्दल अशा खालच्या पातळीवर जाऊन कुणी कशी टीका करू शकता असा सवालही दादा भुसे यांनी उपस्थित केला आहे. यावेळी दादा भुसे यांनी ठाकरे गटावरही चांगलेच टीकास्त्र सोडले. अशा पद्धतीने टीका करणे चुकीचे आहे. आम्हीही करू शकतो, घरात बसून शिवसेना वाढलेली नाही. यासाठी अनेक शिवसैनिकांनी रक्त सांडवलं आहे. अनेकांनी जीवाचं रान केलं आहे. खरं म्हणजे याच चांडाळ चौकटीने शिवसेनेचा घात केल्याचा गंभीर आरोपही दादा भुसे यांनी केला आहे,

Published on: Feb 19, 2023 05:06 PM
शिवसेनेतील सर्वात मोठा ‘व्हिलन’ म्हणत संजय राऊत यांच्यावर कुणी केली विखारी टीका ?
कसबा निवडणुकीत उमेदवार नवा ट्विस्ट, काँग्रेसचा मोठा नाराज नेता प्रचारात उतरणार