‘ज्या घरी जातील, तिथे त्यांनी चांगलं नांदावं’, दादा भुसे यांचा टोला नेमका कुणाला?

| Updated on: Jan 26, 2023 | 2:29 PM

राज्याच्या आढावा बैठकीवर काय म्हणाले दादा भुसे...?

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी हा शरद पवार यांची खेळी असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांच्या आरोपावर दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजचा अतिशय शुभ दिवस आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा आणि राज्याची आणि देशाची वेगवान प्रगती होवो, अशी प्रार्थनाही दादा भुसे यांनी केली आणि यावर बोलणं टाळलं.

राज्याच्या आढावा बैठकीवर बोलताना ते म्हणाले, प्रत्येक जिल्ह्याचे पुढच्या आर्थिक वर्षाचे नियोजन सुरू आहे. वित्तमंत्री हे जिल्हाचा आढावा घेत असतात. प्रत्येक राज्याचा आढावा घेतल्यानंतर राज्याचा बजेट सादर केला जातो. पुढील वर्षांच्या नियोजनाच्या पाश्वभूमीवर या पूर्व तयारीसाठी आजची बैठक झाली. मालेगावातील भाजपचे युवा नेते अद्वय हिरे हे ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि उद्या ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे. यावर बोलताना ते म्हणाले, लोकशाहीत ज्याला त्याला मत आणि अधिकार आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. ज्या घरी जातील, तिथे त्यांनी चांगलं नांदावं, असे म्हणत त्यांनी टोलाही लगावला.

Published on: Jan 26, 2023 02:27 PM