भरगर्दीत स्टेशनवर तरूणीचे कापले केस अन् काढला पळ, दादरमध्ये ‘त्या’ माथेफिरूला पोलिसांकडून अटक
मुलीचे केस कापून माथेफिरूने तिथून पळ काढला होता. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून पोलिसांनी या माथेफिरू आरोपीला अटक केली आहे. माथेफिरू इसमाने दादर स्टेशनवर कॉलेजला जाणाऱ्या एका तरूणीचे केसच कापले आणि बॅगेत भरून पळ काढला.
मुंबईतील दादर रेल्वे स्थानकावर मुलीचे केस कापणाऱ्या माथेफिरूला अटक करण्यात आली आहे. दादर रेल्वे स्थानकावर एका माथेफिरूने एका मुलीचे भरगर्दीत रेल्वे स्थानकावर केस कापले होते. मुलीचे केस कापून माथेफिरूने तिथून पळ काढला होता. सीसीटीव्हीच्या आधारे तपास करून पोलिसांनी या माथेफिरू आरोपीला अटक केली आहे. माथेफिरू इसमाने दादर स्टेशनवर कॉलेजला जाणाऱ्या एका तरूणीचे केसच कापले आणि बॅगेत भरून पळ काढला. त्या तरूणीने त्याचा पाठलाग करत त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दीचा फायदा घेत तो माथेफिरू पळून गेल्याचे पाहायला मिळाले होते. याप्रकरणी तरुणीने पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर मुंबई सेंट्रल लोहमार्ग पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत होते. अखेर हा माथेफिरू पोलिसांच्या हाती लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. तक्रारदार तरूणी ही कल्याणची रहिवासी असून ती माटुंग्यातील रुपारेल कॉलेजमध्ये शिक्षण घेते. कॉलेजला जाण्यासाठी सोमवारी सकाळी तिने कल्याणहून 8 च्या सुमारास गाडी पकडली. 9.15 च्या सुमारास ती दादर स्टेशनवर उतरली त्यावेळी हा प्रकार त्या मुलीच्या लक्षात आला.