मुंबईसह उपनगरात दिवसभरात अनेक गोविंदांना दुखापत, ‘इतके’ गोविंदा झाले जखमी

| Updated on: Sep 08, 2023 | 9:14 AM

VIDEO | पावसासह दहीहंडीच्या जल्लोषात अनेक गोविंदा चिंब भिजले असताना काही गोविंदांना दुखापत, रात्री ११ वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार १०७ गोविंदा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई, ९ सप्टेंबर २०२३ | संपूर्ण राज्यात काल दहीहंडीचा उत्सह बघायला मिळाला. मुंबईसह ठाण्यासारख्या मोठ्या शहरात दहीहंडी उत्सवाची मोठी धूम बघायला मिळते यंदाही मुंबई आणि ठाण्यात चांगलाच उत्साह होता. कित्येक गोविंदा पथकांनी विविध ठिकाणी दहीहंडीच्या ठिकाणी दाखल होत आपला सहभाग दर्शवला. मात्र ही दहीहंडी फोडत असताना अपघाताच्या घटना देखील समोर आल्या आहेत. दहीहंडीचे थर लावताना (रात्री ११ पर्यंत) एकूण १०७ गोविंदा दहीहंडी उत्सवात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  १४ जखमी गोविंदा जवान उपचारासाठी मुंबईतील वेगवेगळ्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यासह ६२ जखमी गोविंदा जवानांवर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Published on: Sep 08, 2023 09:14 AM
Aditya L1 | आदित्य एल १ ने घेतला सेल्फी, इस्त्रोला पाठवलेला पहिला फोटो बघितला का?
मुंबईतील ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी ७०० कोटी खर्च, शिंदे गटावर कुणाचा हल्लाबोल?