‘पुण्यात दहीहंडीची वेळ रात्री १० वाजेपर्यंत नाही तर…’, भाजपच्या आमदाराची शिंदे सरकारकडे मागणी काय?
VIDEO | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे दहीहंडी उत्सवाच्या वेळेत बदल करण्यासाठी भाजप आमदाराचं निवेदन, नेमकी काय केली मागणी?
पुणे, 5 ऑगस्ट 2023 | पुणे शहर आणि जिल्ह्यात साजरा होणाऱ्या दहीहंडी या पारंपारिक उत्सवाची वेळ रात्री १० ऐवजी रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात यावी, अशी मागणी पुण्यातील भाजप आमदार सुनिल कांबळे यांनी केली. यासंदर्भातील निवेदन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. तर पुणे शहर आणि जिल्ह्य दहीहंडी उत्सव समन्वय समितीचे समन्वयक अॅड. राहुल म्हस्के पाटील आणि जालिंदर बाप्पू शिंदे यांनी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे दहीहंडीची वेळ वाढवण्याची मागणी केली होती. आमदार कांबळे यांनी हे निवेदन स्वीकारले होते. त्वरित पत्राद्वारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे यानंतर त्यांनी दहीहंडीची वेळ रात्री १२ पर्यंत करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. यानंतर आता ही मागणी मुख्यमंत्र्यासह उपमुख्यमंत्र्यांकडून मान्य होते की नाही हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.