परभणी : साडी डेपोला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान
शहरातील श्रीहरी साडी डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वसमत रोडवर असलेल्या या साडी डेपोला भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील सामान जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
परभणी : शहरातील श्रीहरी साडी डेपोला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वसमत रोडवर असलेल्या या साडी डेपोला भीषण आग लागली. या आगीमध्ये दुकानातील सामान जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. परंतु आग अटोक्यात येईपर्यंत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.