थेट हात रुमालावर लग्नाचं निमंत्रण, बघा पर्यावरण प्रेमींची भन्नाट आयडीया
VIDEO | हात रुमालावर लग्न पत्रिका छापून दिला अनोखा संदेश, कुठे दिलं असं आमंत्रण आणि काय आहे त्या मागचं कारण? बघा व्हिडीओ
प्रवीण चव्हाण, पालघर : सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू असून वधू-वराकडील मंडळींची जय्यत तयारी सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. अशातच प्रत्येक जण आपलं लग्न कसं सुपरहीट आणि अविस्मरणीय ठरेल याचा प्रयत्न करत असतो. आता लग्न कार्य म्हटल्यांवर लग्न पत्रिका ही आलीच…लग्नाची पत्रिका आकर्षक असली पाहिजे किंवा वेगळी असली पाहिजे, अशी अनेक कुटुंबियांची अपेक्षा असते. त्यामुळे कुणी पारंपारीक पध्द्तीने, तर कुणी वेगळेपण जपत अनोखी लग्न पत्रिका छापून लग्नाचे निमंत्रण देतात. आतापर्यंत तुम्ही अनेक वेगवेगळ्या लग्न पत्रिका पाहिल्या असतील. परंतु हात रुमालावर लग्न पत्रिका कधी पाहिली आहे का ? नाही ना.. मग बघा हा व्हिडीओ
Published on: Feb 28, 2023 11:40 PM