सबसे कातिल गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल अन् आता…, नेमकं प्रकरण काय?
गौतमी पाटील हिची क्रेझ कोण्या सेलिब्रिटींपेक्षा कमी नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हटला की गौतमी पाटीलच्या चाहत्यांची वेड्यासारखी तुफान गर्दी झालेली पाहायला मिळते. गौतमीचा डान्स आणि दिलखेचक अदा पाहण्यासाठी तरूणाई कधी झाडावर चढल्याच्या बातम्या आल्यात तर कधी पोलिसांकडून चाहत्यांना मजबूत चोपही खावा लागल्याचे दिसून आले आहे.
प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील हिच्यावर विनापरवानगी कार्यक्रम आणि नियमांचं उल्लंघन गेल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतमी पाटील ही आज अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात दाखल झाली होती. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी पाईपलाईन रोडवर तिने एक कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमावेळी तिच्या चाहत्यांची तुफान गर्दी झाली होती. मात्र गौतमी पाटील हिने विनापरवानगी कार्यक्रम केला होता. इतकंच नाहीतर यावेळी तिच्याकडून नियमांचं उल्लंघन देखील करण्यात आलं होतं. या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटीलवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी गौतमी पाटील ही अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयात हजर झाली होती. यादरम्यान, न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार गौतमी पाटील हिला जामीन मंजूर केला आहे.