म्हणून गौतमी पाटील हिनं घेतली छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट, दिलं ‘हे’ खास गिफ्ट
VIDEO | गौतमी पाटील हिनं छत्रपती उदयनराजे भोसले यांची का घेतली भेट, म्हणाली...
सातारा : डान्सर गौतमी पाटील ( ) हिच्यावर काल बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तिने थेट साताऱ्यात छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. गौतमीने अचानक उदयनराजे भोसले यांची काल भेट घेतली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. गौतमीने खासदार उदयनराजे यांच्या भेटीत त्यांना आवडणारी भेटवस्तू देखील दिल्याची माहिती समोर आलीय. “मी महाराजांना बुके दिलं. तसेच मला माहिती मिळाली होती की, महाराजांना परफ्यूम खूप आवडतो. त्यामुळे मी आताच येता-येता परफ्यूम घेतला. आम्ही महाराजांना परफ्यूम गिफ्ट केलं”, असे गौतमी पाटीलने सांगितले. तर छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची भेट होईल, असं मला खरं वाटलं नव्हतं. पण अखेर खरंच भेट झाली. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे, म्हणून मला अभिमान वाटतो, असेही तिने म्हटलं.