Dahi Handi 2024 : गौतमीच्या अदांपेक्षा तिच्या लूकची सर्वाधिक चर्चा, बघा असं काय होतं खास?
एकीकडे राज्यभरात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे आयोजक बड्या कलाकारांना देखील आमंत्रित करत आहे. अशातच आज मुंबईत गौतमी पाटील हिची उपस्थिती पाहायला मिळाली. गौतमी पाटील हिचे असंख्य चाहते महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे आजही तिला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
सध्या मुंबई, ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात गोपाळकाला, दहीहंडी उत्सावाचा मोठा जल्लाोष पाहायला मिळत आहे. बड्या राजकीय पक्ष आणि नेते मंडळींकडून दिमाखदार दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. इतकंच नाहीतर लाखोंच्या बक्षीसांची लयलूट देखील गोविंदांसाठी या दहीहंडी उत्सावात असणार आहे. तर या उंचच उंच दही हंड्या फोडण्यासाठी दहीहंडी सकाळपासूनच गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी गौतमी पाटीलने प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथील दहिहंडीला हजेरी लावली होती. तिचं दणक्यात स्वागत करण्यात आल्यानंतर ‘कचकच कांदा..’ गाण्यावर धरला जबरदस्त ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गौतमीने आपल्या अदांनी प्रेक्षकांसह गोविंदाना घायाळ केले. मात्र याची चर्चा होण्यापेक्षा तिच्या लूकची सर्वाधिक चर्चा होत आहे. गौतमी पाटीलने दहीहंडीच्या निमित्ताने खास ब्लाऊज परिधान केले होते. या खास ब्लाऊजने सर्वांचं लक्ष वेधलं. याबद्दल तिला विचारले असता दहीहंडी सेलिब्रेशनसाठी खास ब्लाऊज परिधान केल्याचे तिने सांगितले.