Ratnagiri | दापोली एसटी आगारात कर्मचाऱ्यांचं आंदोलन, एसटीचालक बांगड्या भरुन कामावर
दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले. रविवारी दुपारी 3 वाजता सुटणारी दापोली-ठाणे या शिवशाही बसवर ड्युटीसाठी बांगड्या भरून ते हजर झाले. प्रवाशांना शिवशाही प्रवासी बसने घेऊन ते ठाण्याकडे रवाना झाले.
रत्नागिरी : दापोली एसटी आगारातील चालक अशोक वनवे चक्क हातात बांगड्या भरून ड्युटीवर हजर झाले. रविवारी दुपारी 3 वाजता सुटणारी दापोली-ठाणे या शिवशाही बसवर ड्युटीसाठी बांगड्या भरून ते हजर झाले. प्रवाशांना शिवशाही प्रवासी बसने घेऊन ते ठाण्याकडे रवाना झाले. हे चालक मुळचे बीड येथील असून कुटूंब नोकरीनिमित्त दापोलीत वास्तव्यास आहेत. राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शासकीय सेवेत विलनीकरण करा अशी या कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी आहे. यासाठी राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. तुर्तास कोकणात एसटी सेवा सुरळीत आहे. मात्र आता दापोली एसटी अगरातही कर्मचारी आंदोलनाची ठिणगी पडली आहे.