मानखुर्दमध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आंदोलनाला दरेकरांचा पाठिंबा
एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मानखुर्दमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे.
मुंबई – एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चांगलेच चिरघळले आहे. जोपर्यंत आम्हाला शासकीय सेवेत घेऊन, क वर्गाचा दर्जा देत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आज कर्मचाऱ्यांच्या वतीने मानखुर्दमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.