उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा, सत्ता आल्यावर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर उभारणार

| Updated on: Oct 12, 2024 | 9:49 PM

आमचं दैवत आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून मोठी घोषणा केली. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Follow us on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षनेते उद्धव ठाकरे यांचा शिवतीर्थावर दसरा मेळावा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मोठी घोषणा करत अनेक उदाहरणं देखील दिली. ‘कृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला. पण अंमलात आणली ती शिवाजी महाराजांनी. त्यांच्यावरही आप्तस्वकीय आले होते. त्यांनी विचार केला नाही. त्यांनी चालून येणाऱ्यांचा शिरच्छेद केला. आपल्यालाही असाच शिरच्छेद करावा लागेल. आपण जय श्रीराम बोलतो. पण पुराणात राम होऊन गेले. श्रीरामाने रावणाचा वध केला म्हणून पाळतो. रामाबरोबर वानर सेना होती. आपण त्यांना दे मानतो. आमच्या शिवाजी महाराज कोण होते. फार पूर्वी नाही, तेव्हा जे स्वराज्यावर चालून आले, त्यांचा वध केला नसात तर आपण आज नसतो. आपलं काय झालं असतं कुणाला माहीत नाही. रामाने जसै दैत्य मारले. तसे शिवाजी महाराजांनी राक्षस आणि दैत्य मारले. अफजल खान हा दैत्यच होता. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. नालायकांनो पुतळा पाडला. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधल्याशिवाय राहणार नाही. आमचं दैवत आहे. जसं आम्ही जय श्रीराम म्हणतो. तसं आम्ही त्याच मोठ्या आवाजात जय शिवराय म्हणणार. जय शिवराय हा महाराष्ट्राचा मंत्र आहे’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.