‘भाजपच्या खोडाला दाढीवाला खोड किडा आणि बोंडाला गुलाबी अळी…’; उद्धव ठाकरेंची जिव्हारी लागणारी टीका
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर जहरी टीका केली. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह सरकारवर निशाणा साधला
“अमित शाहा तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली आहे ती बघा”, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली. उद्धव ठाकरे भाषणातून असे म्हणाले की, अमित शाह तुमचा भाजप सांभाळा. दहा बारा दिवसांपूर्वी मी नागपूरला गेलो होतो. मी शहरीबाबू आहे. मी शेतकऱ्यांचं कर्जमुक्त केलं. माझं कर्तव्य म्हणून केलं. दहा रुपयात पोळी भाजी दिली कर्तव्य म्हणून दिली. मी कोरोनात काम केलं. ते कर्तव्य म्हणून केलं. मी नागपूरला गेलो. लोकांनी व्यथा सांगितल्या. सोयाबीनला भाव नाही. संत्र्यावर डिंक्या रोग येतो. कापसाच्या बोंडावर गुलाबी अळी येते. ती जॅकेट घालते की नाही माहीत नाही. अमित शाहजी तुमच्या भाजपच्या खोडाला दाढीवाला खोडकिडा लागलाया आणि तुमच्या बोंडाला गुलाबी अळी लागली ती बघा. आम्हाला वाईट वाटतं एकेकाळचा आमचा मित्र पोखरला जातो. त्यांना सत्ता पाहिजे. कोणी चालेल पण सत्ता पाहिजे. याला म्हणतात सत्ता जिहाद, असे ठाकरे म्हणाले.