‘गाय राज्यमाता झाली तर मग गाईचा हंबरडा काय…’, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा
'शिवसेनाप्रमुखांनी याच ठिकाणी सांगितलं होतं सर्व भेदाभेद घालवून मराठी माणसाची एकजूट बांधा. जेव्हा मराठी माणसाची ताकद उभी राहिली नसती तर मोदीजी तुम्ही दिल्लीत दिसला नसता. ही मराठी माणसाची ताकद आहे. आम्ही काय गुन्हा केला होता.' उद्धव ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर दसरा मेळाव्यात बोलताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ‘गायीला राज्यमातेचा दर्जा दिला. देशी प्रजाती वाचवलीच पाहिजे. पण मला प्रश्न पडला. तर गाय राज्यमाता झाली आहे. मग राज्यभाषा काय आहे. गाईचा हंबरडा राज्यभाषा आहे. मग हा हंबरडा राज्यभाषा असेल तर कोवळ्या मुलींवर अत्याचार होत आहे. तर तो हंबरडा तुमच्या कानावर का जात नाही. पहिलं आईला वाचवा, मग गायीला वाचवा. हे आमचं हिंदुत्व आहे. महागाईपासून दूर जाण्यासाठी गायीच्या पाठी लपत आहात’, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. तर पुढे ते असेही म्हणाले, एका तरुणाला गोरक्षकांनी मारलं. त्याचा पाठला करून मारला. गोमांस घेऊन जाणार असल्याचा आरोप होता. पण तो आर्यन मिश्रा निघाला. म्हणून बातमी आली नाही. मग तो आर्यन खान, किंवा आर्यन शेख असता तर त्याचा किती आगडोंब झाला असता. किरण रिजीजू म्हणतात मी बीफ खातो. त्याचं काय करणार. मला हे थोतांड हिंदुत्व मान्य नाही.त्यामुळे मी त्यांच्याशी लढत आहे. मराठी लोकात भांडणं लावत आहे. याला आरक्षण देऊ त्याला आरक्षण देऊ म्हणून सांगता. तुमच्यात धमक असेल तर आरक्षण देऊन टाकायला हवं होतं. मराठा, आदिवासी, धनगरांना का आरक्षण दिलं नाही. वाजपेयींनीही धनगरांना आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. आजही ते आश्वासन पाळलं नाही. तुम्ही का जातीपातीत भांडणं लावत आहेत, असा घणाघातही उद्धव ठाकरेंनी केला