Datta Dalvi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द अन् नंतर अटक; कोण आहेत दत्ता दळवी?

| Updated on: Nov 29, 2023 | 5:11 PM

राजस्थानमधील प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुह्रदयसम्राट’ अशी उपमा लावण्यात आली होती. त्यामुळे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली यानंतर त्यांना अटक झाली. बघा त्यांनी नेमकं काय म्हटलं आणि कोण आहेत दत्ता दळवी?

Follow us on

मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांनी त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांना अटक केल्यानंतर ठाकरे गटात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी भांडूपध्ये ठाकरे गटाने कोकणवासियांचा मेळावा आयोजित केला होता. यामध्ये दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्द वापरले होते. राजस्थानमधील प्रचारावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे ‘हिंदुह्रदयसम्राट’ अशी उपमा लावण्यात आली होती. त्यामुळे दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केली यानंतर त्यांना अटक झाली. या अटकेनंतर दत्ता दळवी नेमके आहे कोण? अशी चर्चा होताना दिसतेय. दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नेमकी काय केली टीका की ज्यामुळे त्यांना थेट अटक करण्यात आली?