VIDEO : Kolhapur | कोल्हापुरात दत्त जयंतीचा उत्साह, मंदिरात आकर्षक रांगोळीची सजावट
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे दत्त जयंती साजरी केली जात नव्हती. पण यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करून दत्त जयंती उत्सवाला सुरू झाली आहे. सकाळपासून काकड आरती भजन कीर्तन सुरू आहे.
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे दत्त जयंती साध्या पध्दतीने साजरी केली जात होती. मात्र, यावेळी कोरोनाचे नियम पाळून दत्त जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे दत्त जयंती साजरी केली जात नव्हती. पण यावेळी नियमांचे काटेकोरपणे पालन करून दत्त जयंती उत्सवाला सुरू झाली आहे. सकाळपासून काकड आरती भजन कीर्तन सुरू आहे. तसेच दत्त मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे, नाशिक आदी भागातून दत्त दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे.