सुषमा अंधारेंसोबत पत्रकार परिषद घेत सूनेचे तडस यांच्यावर स्फोटक आरोप, बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Apr 12, 2024 | 10:46 AM

सूनेच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी ब्लॅकमेल म्हणत हे घणाघाती आरोप फेटाळले. घरातून थेट बेघर केल्याचा आरोप तडसांवर सूनेने केलाय. तर मुलासोबत प्रेम विवाहातून लग्न झालं, वेगळेही राहिले..त्यात मी दोषी कसा? असा सवाल करत खासदार तडस यांनी हे सगळं ब्लँकमेलिंग सुरू असल्याचे म्हणत आरोप फेटाळले.

भाजपने वर्ध्यातून उमेदवारी दिलेल्या रामदास तडस यांच्या सूनेनेच त्यांच्यावर घरातून बाहेर काढल्याचे आरोप केलेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत पूजा तडस यांनी गंभीर आरोप केलेत. सूनेच्या आरोपानंतर रामदास कदम यांनी ब्लॅकमेल म्हणत हे घणाघाती आरोप फेटाळले. घरातून थेट बेघर केल्याचा आरोप तडसांवर सूनेने केलाय. तर मुलासोबत प्रेम विवाहातून लग्न झालं, वेगळेही राहिले..त्यात मी दोषी कसा? असा सवाल करत खासदार तडस यांनी हे सगळं ब्लँकमेलिंग सुरू असल्याचे म्हणत आरोप फेटाळून लावलेत. तर पती पंकज तडस यांनी हनी ट्रॅपमध्ये फसवल्याचा आरोप पत्नी पूजा तडस यांच्यावर केलाय. पूजा आणि पकंज तडस यांचं हे प्रकरण अडीच वर्षांपूर्वी उघडकीस आले होते. ८ सप्टेंबर २०२१ ला पूजा तडस यांचा एक व्हिडीओ तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांकडून ट्वीट करण्यात आला आहे. कोणता होता तो व्हिडीओ? काय म्हटलं होतं त्यात… बघा स्पेशल रिपोर्ट…

Published on: Apr 12, 2024 10:45 AM
शाहू महाराज दत्तक? संजय मंडलिकांची ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतरही मग्रुरी कायम
बारामतीची लढाई आता ओरिजनल पवारांपर्यंत, पवार विरुद्ध पवार लढाईत गाजतोय ‘मूळ पवार’चा मुद्दा