Breaking | भारतात झायडस कॅडिला लसीच्या वापरास मंजुरी, आपत्कालीन वापरास DCGI कडून मंजुरी

| Updated on: Aug 20, 2021 | 9:25 PM

झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) ZyCoV-D या लसीला अखेर औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ZyCoV-D लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे. देशात आणखी एक लस उपलब्ध झाल्यामुळे आता लसीकरणाला गती येण्याची शक्यता आहे.

औषध निमिर्ती कंपनी झायडस कॅडिलाच्या (Zydus Cadila) ZyCoV-D या लसीला अखेर औषध महानियंत्रक अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ZyCoV-D लसीने सुरक्षिततेचे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे डीजीसीआयने हा निर्णय घेतला आहे. ही लस पूर्णपणे स्वदेशी असून डीएनएवर आधरित असणारी जगातील पहिली लस आहे. देशात आणखी एक लस उपलब्ध झाल्यामुळे आता लसीकरणाला गती येण्याची शक्यता आहे. कंपनीने डीसीजीआयकडे रितसर अर्जसुद्धा केला होता. तोच अर्ज मंजूर करुन डीसीजीआयने ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. दिलेल्या मंजुरीनुसार ZyCoV-D ही लस आता 12 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलांना तसेच 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या सर्व नागरिकांना देता येईल.

Published on: Aug 20, 2021 09:25 PM