मी लेचापेचा माणूस नाही…अजित पवार चांगलेच भडकले, नेमकं काय घडलं?

| Updated on: Nov 26, 2023 | 8:38 AM

मला राजकीय आजार होईल, इतका मी लेचापेचा नाही, अशा शब्दात भाष्य करत अजित पवार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर भडकले. दादांना असा कोणता मच्छर चावला असे म्हणत अजित पवार यांना राजकीय डेंग्यू झाला, असे राऊत म्हणाले होते.

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : दिल्लीतील अमित शाह यांच्यासोबत झालेल्या भेटीवरून अजित पवार यांनी १५ दिवसानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मला राजकीय आजार होईल, इतका मी लेचापेचा नाही, अशा शब्दात भाष्य करत अजित पवार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर भडकले. दादांना असा कोणता मच्छर चावला असे म्हणत अजित पवार यांना राजकीय डेंग्यू झाला, अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. मात्र आपण इतका लेचापेचा नसून राजकीय आजार आपल्याला नाही, असं अजितदादांनी म्हणत चांगलंच खडसावलंय. अजित पवार यांच्या अमित शाह यांच्या भेटीचं टायमिंग सुद्धा खास होतं. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याने ते काही दिवस राजकीय घडामोडींपासून दूर जरी असले तरी त्याच्या भेटीगाठी सुरू असल्याचे पाहायला मिळाले. डेंग्यू असताना अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली होती. नेमकं काय घडलं?

Published on: Nov 26, 2023 08:28 AM
काँग्रेस नेते, विरोधी पक्ष नेते आणि ओबीसी नेते; विजय वडेट्टीवार यांची नेमकी भुमिका काय? एकाच आठवड्यात तिनदा यु-टर्न