Ladki Bahin Yojana : महिलांनो…‘लाडकी बहीण’चा अर्ज करायला उशीर होतोय काळजी करू नका, अजितदादांनी केली मोठी घोषणा

| Updated on: Jul 14, 2024 | 4:55 PM

ajit pawar on Ladki Bahin Yojana : आज बारामतीत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'लाडकी बहीण योजने'वर भाष्य केलं. यावेळी अजित पवार यांनी महिलांना आश्वस्त केलं आहे. फॉर्म भरायला उशीर झाला तरी घाबरू नका. एकाद्या भगिनीने ऑगस्टमध्ये जरी ‘लाडकी बहीण योजने’चा फॉर्म भरला तरी...

Follow us on

राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा सरकारकडून करण्यात आली. यावेळी विरोधकांनी टीका केली. वेडवाकडं बोलले पण त्याला फार महत्त्व दिलं नाही. कारण महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विश्वास होता ही योजना चांगल्या प्रकारे आपण राबवू शकतो, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं. कारण या योजनेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या मातेला मुलीला आण बहिणाला मदत मदत करायची होती, असे म्हणत असताना अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. लाडकी बहीण योजना ही १ जुलै पासून सुरू करण्यात आली आहे. महिलांनो तुम्ही काळजी करू नका, कारण ऑगस्टमध्ये फार्म भरला तरी जुलैचे पैसे देणार, असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले. तर चांद्यापासून बांद्यापर्यंत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला दीड हजार रूपये मिळणार आहे. रक्षाबंधन या महिन्यात आहे त्यामुळे दोन महिन्याचे पैसे ऑगस्टमध्ये मिळणार असल्याचे अजित पवार म्हणाले.