विखे पाटलांच्या त्रासानं निलेश लंके शरद पवारांकडे गेले? अजितदादांच्या ‘त्या’ दाव्यानं खळबळ
'राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्रासामुळेच निलेश लंके महाविकास आघाडीमध्ये गेल्याचा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. महायुतीमध्ये लढणार असं सांगताना भाजपनं धाराशिवची जागा इच्छा नसतानाही लढायला लावली आणि नगर माढ्यात इच्छा असतानाही लढायला मिळालं नाही,', अजितदादा काय म्हणाले?
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे सर्व्हे समोर येऊ लागल्यानंतर अजित पवार गटाने २८८ जागांवर सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी आपल्या नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा केल्यात. त्यात सध्या चर्चेत असलेल्या दैनिक सकाळच्या सर्व्हेवरही चर्चा केल्याची माहिती आहे. या अनौपचारिक गप्पांमधून अजित पवार यांनी दोन मोठे दावे केलेत. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या त्रासामुळेच निलेश लंके महाविकास आघाडीमध्ये गेल्याचा मोठा दावा अजित पवार यांनी केला आहे. महायुतीमध्ये लढणार असं सांगताना भाजपनं धाराशिवची जागा इच्छा नसतानाही लढायला लावली आणि नगर माढ्यात इच्छा असतानाही लढायला मिळालं नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलंय. ‘नगर लोकसभा निलेश लंके महायुतीकडून लढण्यास तयार होते. दक्षिण नगरमधून लंके आणि माढ्यातून धैर्यशील मोहिते लढणार होते. पण भाजपने दोन्ही जागा आमच्या पक्षाला सोडल्या नाहीत’, असा गौप्यस्फोटच अजित पवारांनी केला.