Ajit Pawar यांना अर्थखात्याबद्दल शंका? भविष्याची चिंता की पुन्हा होणार राजकीय भूकंप?
VIDEO | 'आज मी अर्थमंत्री आहे, पण भविष्यात अर्थखातं राहिल की नाही माहित नाही', अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नव्या चर्चेला सुरुवात, राज्यात पुन्हा एकदा होणार राजकीय भूकंप ?
मुंबई,२५ सप्टेंबर २०२३ | आज मी अर्थमंत्री आहे, पण भविष्यात अर्थखातं राहिल की नाही माहित नाही, असं बोलून अजित पवारांनी नव्या चर्चेला सुरुवात केलीय. सत्तेत अजित पवारांना डावलंल जात असल्याचा दावा विरोधक करतायत. तर अजित पवारांचं हे विधान उत्स्फुर्त असून त्यात कसलीही तक्रार नव्हती., असं भाजप म्हणतेय. नुकतेच अमित शाहांचा मुंबईत होते. शाहांच्या गणेश दर्शनावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हजर होते. गणेश दर्शनानंतर तिघांमध्ये बैठकही झाली, पण त्याला अजित पवार अनुपस्थित राहून बारामतीच्या दौऱ्यावर होते. मात्र हा पूर्वनियोजीत कार्यक्रम असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय. पण दुपारी गैरहजर राहणं आणि संध्याकाळी अर्थखात्यावरुन विधान करणं यावरुन अनेक तर्क मांडले जातायत.
यामध्ये सर्वात इंट्रेस्टिंग प्रतिक्रिया भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा अजित पवार विरोधात होते, तेव्हा मोबाईल बंद करुन अजित पवार पळून जातात. अशी विखारी टीका बावनकुळेंनी केली होती., मात्र आता अजित पवार कर्तुत्ववान आणि कर्तव्यदक्ष नेते असल्याची पावती बावनकुळे देतायत. बघा काय म्हणाले बावनकुळे.