शरद पवारांसोबत पुन्हा जाणार? घसवापसी करणार? अजित पवार एकाच शब्दात म्हणाले….
‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला अजित पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांना शरद पवार यांच्यासोबत परत जाणार का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी बोलणं टाळत केवळ एका शब्दात उत्तर देणं पसंत केलं. अजित पवार यांनी ‘नो कमेंट्स’ असं उत्तर दिलं.
अजित पवार यांना पुन्हा शरद पवार यांच्यासोबत जाणार का? असा सवाल ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीत विचारला असता त्यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. अजित पवार यांनी नो कॉमेंट्स… म्हणत यावर अधिक बोलणं टाळलं आहे. तर अजित पवार पुढे असेही म्हणाले की, मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काम केलं. कोणत्या मतदारसंघात काय केलं याची माहिती लोकांना देत आहोत. लोकसभा निवडणुकीत आमच्याकडून जे काही बाकी राहिलं. त्यामुळे मतदार आमच्यासोबत आला नाही. त्यांना समजावत आहोत, असे अजित पवार म्हणाले. बघा नेमकं काय म्हणाले अजित पवार?
Published on: Aug 15, 2024 06:00 PM