एका गोष्टीसाठी धनंजय मुंडे यांचा राजीनामा नाही, मंत्रिपद तूर्तास वाचलं, अजित पवार स्पष्टच म्हणाले…
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा विरोधकांकडून मागितला जातोय. अशातच पहिल्यांदा अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करत मौन सोडले
विरोधकांसह महायुतीच्या दोन आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. मात्र बऱ्याच दिवसांनी अजित पवार यावर बोलले. बीड प्रकरणाची तिहेरी चौकशी सुरू आहे. तर आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत, असेही अजित पवार म्हणाले म्हणजेच तुर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. पुरावा आणि चौकशी समितीचा अहवाल आल्याशिवाय धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, हे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. ज्या खंडणीच्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असून तो धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होतेय. पण मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं असून कितीही वरिष्ठ पातळीचा व्यक्ती असो, तो दोषी आढळल्यास गय केली जाणार नसल्याचे अजित पवार म्हणाले. त्यामुळे एक बाब स्पष्ट झाली आहे अजित पवार पुराव्याची वाट पाहताय. सीआयडी, एसआयटी आणि न्यायालयीन अशी तिहेरी चौकशी या प्रकरणात सुरू आहे त्यामुळे अहवाल, पुरावे समोर येईपर्यंत अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाही. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बघा काय म्हणाले अजित पवार?