शरद पवार अन् प्रफुल्ल पटेल यांची ‘त्या’ भेटीवर अजित पवार यांचं भाष्य, सप्ष्टच म्हणाले…
VIDEO | शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेतील कॅफेटेरिया येथे झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलेल्या फोटोवर अजित पवार यांची प्रतिक्रिया, काय केलं भाष्य?
पुणे, २४ सप्टेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने नवी दिल्ली येथे गेले असता अजित पवार यांच्या गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांची भेट झाल्याचे समोर आले आहे. राज्यसभेत कॅफेटेरिया येथे मंगळवारी शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट झाली. या भेटीचा फोटो प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केला आहे. प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्या आज झालेल्या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे. यानंतर राजकीय वर्तुळातूनदेखील शरद पवार आणि अदानी यांच्या भेटीवर प्रतिक्रिया येत आहे. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीवर आणि फोटोवर अजित पवार यांनी भाष्य केले आहे. ‘शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर मला काही बोलायचे नाही, तुम्ही विकासाच्या मुद्यावर प्रश्न विचारा फोटोवर नको ‘, असे म्हणत अजित पवार यांनी पत्रकारांनाच फटकारले आहे.