‘लाडकी बहीण’ नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित पवार पहिल्यांदाच स्पष्ट बोलले, म्हणाले…

| Updated on: Sep 10, 2024 | 4:26 PM

महायुतीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेवरुन श्रेयवादाची लढाई सुरु असल्याचे गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. या योजनेवरून मागच्या आठवड्यात महायुतीमधील विसंवाद समोर आला होता. अशातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेवरुन वाद झाल्यानंतर अजित पवार पहिल्यादा माध्यमांसमोर बोलले....

Follow us on

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ ही महायुती सरकारची योजना आहे. पण अजित पवार यांचा पक्ष सर्वश्रेय आपल्याकडे घेतोय, असा आक्षेप गेल्या आठवड्यातील लाडकी बहीण योजनेवरुन मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदेंच्या शिवसेनेकडून घेण्यात आला होता. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असे सरकारी योजनेचे नाव असताना फक्त ‘माझी लाडकी बहीण योजना’ असं नाव दिलं जातंय, असा आक्षेप शिंदेंच्या काही नेत्यांकडून घेण्यात आला होता. दरम्यान, योजनेच्या श्रेयवादावर होणाऱ्या टीकेच्या यासंदर्भातील सवाल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना केला असता त्यांनी पहिल्यांदा आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सध्या भाजपा आणि शिवसेनेच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो गायब असल्याचे दिसतेय. यावर अजित पवार आज पहिल्यांदा बोलले. भाजपाने तुमचा फोटो काढलाय? या प्रश्नवार अजित पवार म्हणाले की, “मीच त्यांना सांगितलय की, माझा फोटो लावू नका. माझे फारच फोटो सगळीकडे सुरु झालेत. मी म्हटलं जरा कमी करा. लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणली आहे. महायुतीमधील घटक पक्ष या योजना आपल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करत आहेत”