… अन् अजितदादा भडकले; नबाव मलिक यांच्यासंदर्भातील देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रावर नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Dec 08, 2023 | 11:12 AM

देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहीले. या पत्रावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, काल सभागृहात नबाव मलिक अजित पवार गटातील आमदारांसोबत बसल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांनी कुणासोबत बसावं, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे.

नागपूर, ८ डिसेंबर २०२३ : देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहीले असून नवाब मलिक यांना महायुतीत समाविष्ट करुन घेण्यास विरोध केला आहे. या पत्रावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला ते पत्र मिळालं आणि मी ते पत्र वाचलं. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक हे सभागृहात आले होते. ते कुठे बसले? हे माध्यमांनी दाखवलं. मात्र गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय घटना घडून गेल्यात. त्यानंतर नवाब मलिक हिवाळी अधिवेशनात सहभागी झालेत. यामध्ये स्वतः नवाब मलिकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेतल्यानंतर माझी भूमिका स्पष्ट करेन असं थेट अजित पवार यांनी म्हटलं. पुढे अजित पवार असेही म्हणाले, यासंदर्भात नवाब मलिक यांना त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे कोर्टाने त्यांना संधी दिली आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मात्र यावर त्यांचं मत काय हे आहे तर कळूद्या.. दरम्यान, काल सभागृहात नबाव मलिक अजित पवार गटातील आमदारांसोबत बसल्याचे पाहायला मिळाले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, त्यांनी कुणासोबत बसावं, हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, असेही त्यांनी स्पष्टपणे म्हणाले.

Published on: Dec 08, 2023 11:12 AM
Mehmood Junior : ज्येष्ठ अभिनेते ज्युनिअर महमूद यांचं निधन, ‘या’ आजाराशी देत होते झुंज
नवाब मलिक आजही सत्ताधारी बाकावरच; देवेंद्र फडणवीस यांचा लेटर बॉम्ब निकामी?