निवडणुकीत वायदा अन् सत्ता आल्यानंतर यु-टर्न, फडणवीसांचा ‘तो’ वादा अजित दादा विसरले?
एका कार्यक्रमात लोकांनी फडणवीसांनी केलेल्या एका वायद्याबद्दल विचारणा केली. त्यावर मी तुम्हाला कर्जमाफीबद्दल बोललो का? असा सवाल अजित पवार यांनी केला.
प्रचारादरम्यान शेतकरी कर्जमाफीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केलेला वादा अजित पवार विसरल्याचे दिसून आलंय. एका कार्यक्रमात लोकांनी फडणवीसांनी केलेल्या एका वायद्याबद्दल विचारणा केली. त्यावर मी तुम्हाला कर्जमाफीबद्दल बोललो का? असा सवाल अजित पवार यांनी केला. महाराष्ट्राची सत्ता दिल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या वायद्यारून अजित पवार यांनी यू-टर्न घेतलाय. प्रचार महायुती सरकार म्हणून झाला असला तरी आपण तुम्हाला कर्जमाफीचा वायदा तुम्हाला दिला नव्हता, असं अजित पवार म्हणाल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. कारण देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता. जिंकून आल्यानंतर दिलेल्या वायद्यांच्या शब्दांचा खेळ कसा होतो याचंच चांगलं उदाहरण अजित पवार गटातील मंत्री हसन मुश्रीफ यांनी घालून दिलं. २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी देऊ, कारण सरकारला अजून पाच वर्ष बाकी आहेत, असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळळंय. तर शेतकरी कर्जमाफीच्या विधानावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दादांनी उत्तर दिलंय. बघा काय म्हणाले दरेकर?