महायुतीत आता ‘निधी’ नाट्य; निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत अजित दादांची नाराजी?
मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री विजयकुमार गावित या मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे अधिकच्या निधीची मागणी केली होती. मात्र अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री विजयकुमार गावित या तिनही मंत्र्यांना निधी देण्यास नकार दिला...
निधी देण्यावरून मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री विजयकुमार गावित या मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे अधिकच्या निधीची मागणी केली होती. मात्र अजित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री विजयकुमार गावित या तिनही मंत्र्यांना निधी देण्यास नकार दिला असल्याची माहितीही सूत्रांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या मंत्र्यांकडून निधीची मागणी कऱण्यात आल्याने अजित पवार यांच्याकडून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर ७ महत्त्वाच्या योजना राबवण्यात येत असल्याने १ लाख कोटी खर्च झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले. यानंतर अजित पवारांनी निधी दिला नाही म्हणून तिनही मंत्री नाराज झाले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.